आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख वणवा पेटला:भुसावळचा पारा @ 45.7 अंश‎; 13 मे पर्यंत तापमानात पुन्हा वाढीचा अंदाज‎

प्रतिनिधी | भुसावळ‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉटसिटी भुसावळात वैशाख वणवा‎ पेटला आहे. सलग पाचव्या दिवशीही‎ शहराचे कमाल तापमान ४२ अंशांच्या‎ वर राहिले. तर शुक्रवारी शहरात‎ यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक‎ ४५.७ अंश तापमानाची नोंद केंद्रीय‎ जल आयोगाने केली आहे. सूर्य आग‎ ओकत असल्याने शहरातील‎ जनजीवनावर परिणाम झाला आहे.‎ बाजारपेठ भागातील रस्ते दुपारी‎ निर्मनुष्य होत असून अघोषित‎ संचारबंदीसारखी स्थिती निर्माण‎ झाली आहे. तापमानात १३ मे पर्यंत‎ पुन्हा वाढीचे संकेत हवामान विभागाने‎ दिले आहेत.‎

हॉटसिटी भुसावळातील‎ तापमानाचा पारा एप्रिल महिन्याच्या‎ अखेरीस ३६ अंशांपर्यंत घसरला‎ होता. तर गेल्या रविवारी दि. ७‎ तापमान ४०.५ अंशांवर होते.‎ सोमवारपासून तापमानात प्रचंड वाढ‎ झाली. सलग पाचव्या दिवशीही‎ शहराचे तापमान ४२ अंशांच्या वर‎ आहे. शुक्रवारी शहराचे कमाल‎ तापमान यंदाच्या मोसमातील‎ सर्वाधिक ४५.७ अंशांवर पोहोचला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तर किमान तापमान २७.२ अंशांवर‎ पोहोचल्याची नोंद केंद्रीय जल‎ आयोगाच्या कार्यालयाने केली आहे.‎ शहरात सकाळी १० वाजेपासूनच‎ उन्हाचा तडाखा वाढतो. यामुळे दुपारी‎ १२ वाजेनंतर बाजारपेठेत रस्ते‎ निर्मनुष्य होत आहेत. दुपारी १२ ते‎ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्राहकच‎ नसल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर‎ परिणाम झाला आहे. सायंकाळी सात‎ वाजेनंतर रस्त्यांवर गर्दी दिसून आली.‎

१६ टक्क्यांपर्यंत‎ घसरली आर्द्रता‎

तापीकाठावर वसलेल्या‎ भुसावळ शहरातील वातावरणात‎ उन्हाळ्यातही २० टक्क्यांपर्यंत‎ आर्द्रता असते. मात्र सध्या‎ तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ‎ झाली. यामुळे आर्द्रतेमध्येही घट‎ झाली आहे. शहरातील‎ वातावरणात शुक्रवारी दि. १२‎ रोजी आर्द्रता १६ टक्क्यांपर्यंत‎ घसरली होती. कोरडे वातावरण‎ असल्याने उष्णतेच्या‎ चटक्यांत वाढ झाली.‎