आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुयार, शिंदे यांचे राज्यसभेला मविआलाच मतदान:राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोद अनिल पाटील यांचा दावा; शिवसेना पडली एकाकी

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवासाठी थेट तीन अपक्ष आमदारांना जबाबदार धरले आहे. दरम्यान, खासदार राऊत यांनी उल्लेख केलेल्या त्या तीनही आमदारांनी आघाडीच्याच उमेदवाराला मतदान केले असून मी प्रत्यक्ष तेथे उपस्थित असल्याचा दावा राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार तथा पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजयमामा शिंदे, आमदार श्याम सुंदर शिंदे यांची मते फुटल्याचे जाहीर केले होते. दरम्यान, या तिन्ही आमदारांनी महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला मते दिली असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची दोन विधाने आल्याने आघाडीत सारे काही आलबेल नसल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आमदार अनिल पाटील यांचा याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला असून त्यात माझ्यास सुनिल तटकरे आणि संजय खोडके हे दोन्ही नेते त्यावेळी उपस्थित असल्याचा दावाही केला आहे.

बातम्या आणखी आहेत...