आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायाेकेमीकल ऑइल व्यवसायाचे आमिष:जळगावातील हॉटेल व्यावसायिकाची 16 लाखांची फसवणूक

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायोकेमीकल ऑइलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनीच्या आलेल्या दोन जणांच्या बँक खात्यावर 16 लाख रुपये टाकत ऑइलची मागणी केल्यावर ऑइल देण्यास व पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गुजरातमधील सूरत येथील दोन जणांविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात रविवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील हॉटेल व्यावसायीक सारंगधर महादेव पाटील उर्फ छोटू ढाबेवाले यांना बायोकेमीकल ऑईलचा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यामुळे त्यांनी सूरत येथून आलेल्या कंपनीच्या हिरेन तोमर व राकेश (पूर्ण नाव माहिती नाही) दोन एजंट यांच्याशी चर्चा केली. पाटील यांनी दोन्ही एजंट यांना 20 लाख रुपयांच्या ऑइलची ऑर्डर दिली.

वारंवार मालाची मागणी

ऑर्डर दिल्यावर 20 लाख रुपये पाटील यांनी या दोन्ही जणांच्या व्यक्तीगत बँक खात्यावर टाकले. ही घटना 3 डिसेंबर 2021 या दिवशी घडली. पाटील यांनी त्यांना 16 लाख रुपये बँक खात्यावर टाकल्यावर त्यांना वारंवार मालाची मागणी केली, त्यांना गाडी निघाली आहे, गाडी खराब झाली आहे, उद्या माल पाठवितो असे उत्तर मिळत हाेती. त्यांनी शेवटी पैसे परत करावे, असे सांगितले.

फसवणूकीचा गुन्हा दाखल

ऑइल देऊ नका, मात्र माझे पैसे परत करा, असे सूचीत केले. गेल्या वर्षभरापासून दोन्ही जणांशी त्यांचे बोलणे चालू होते, मात्र मला काही पाठविला जात नव्हता. या प्रकरणी पाटील यांनी लेखी करार केला होता, मात्र त्या कराराचा दाेन्ही जणांनी भंग केला. त्यामुळे सारंगधर पाटील यांनी शनिवारी बाजारपेठ पाेलिस ठाणे गाठत पाेलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला.

16 लाखांची फसवणूक

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरेन तोमर व राकेश यांच्या विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गोपाळ गव्हाळे पुढील तपास करीत आहे. 16 लाख रुपयात फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्ग या घटनेमुळे चक्रावले आहे. व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...