आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचा प्रश्न बिकट:जैविक तपासणीत 45 गावांमधील पिण्याचे पाणी आढळले दूषित

जळगाव / प्रदीप राजपूत6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात विविध गावांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात ४५ गावांत पिण्याचे पाणी दूषीत आढळून आले आहे. गावातील जलवाहिनीला गळती लागलेली असणे, नळातून गटारीचे पाणी जलवाहिनीत शिरणे, टीसीएल पावडरचा वापर कमी ही या मागणी कारणे आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने तातडीने या गावातील पाणी शुद्धीकरणाबाबत गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.

स्वच्छता व पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण आणि आराेग्य विभागाकडून जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच गावांचे जलस्त्राेत, पाणीपुरवठा याेजनांतून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यात १६२९ नमुन्यांपैकी ०.०३ टक्के नमुने दूषीत असल्याचे आढळून आल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यात चाळीसगाव, मुक्ताईनगर, पाराेळा, पाचाेरा, रावेर, यावल, बााेदवड, अमळनेर आणि भडगाव या तालुक्याचा समावेश आहे. भुसावळ आणि चाेपडा या दाेन तालुक्यात मात्र एकही नमूना दूषीत आढळलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यात ४५ गावांचे पाण्याचे नमुने दूषीत असल्याने तेथे उपाययाेजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

जलवाहिनीत गटारीचे पाणी शिरत असल्याचे आले समाेर
जिल्हा परिषदेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना कळवण्यात आले आहे. पाण्याच्या जैविक तपासणीत दूषीत आढळून आलेल्या नमुन्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन लिकेज असल्याचे आढळून आले आहे. पाइपात गटारीचे पाणी शिरणे, गटारीवर असलेल्या खुल्या नळात पाणी जाणे, पावसाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टीसीएल पावडरचा वापर न करणे आदी कारणे या तपासणीच्या माध्यमातून पुढे येताहेत.

गावातच करता येणार पाणी तपासणी, किट वाटप केले
पाण्याच्या प्रयाेगशाळेपुर्वी गावातच तपासणी करण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातर्फे एक किट वाटप केले जात आहे. या किटमधील एका बाटलीत पाणी भरून ते २४ तास अंधारात ठेवावे लागते. पाणी दूषीत असल्यास काचेच्या बाटलीतील पाणी गढूळ किंवा काळ्या रंगाचे हाेते. पाणी दूषीत नसल्यास पाण्याचा रंग बदलत नाही. गावांना हे किट वाटप करून तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे.

वार्षिक सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३६ गावांना दिले पिवळे कार्ड
स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातर्फे पावसाळ्यापुर्वी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जिल्ह्यात एरंडाेल तालुक्यातील नांदखुर्द या गावात दूषीत पाणी असल्याने लालकार्ड देण्यात आले आहे. तर ३६ गावांना पिवळे कार्ड देण्यात आले. लालकार्ड मिळालेल्या गावातील पाणी पिण्यास अयाेग्य असून पिवळे कार्ड मिळालेल्या गावात पाण्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...