आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात विविध गावांमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यात ४५ गावांत पिण्याचे पाणी दूषित आढळून आले आहे. गावातील जलवाहिनीला गळती लागलेली असणे, नळातून गटारीचे पाणी जलवाहिनीत शिरणे, टीसीएल पावडरचा वापर कमी ही या मागणी कारणे आहेत. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने तातडीने या गावातील पाणी शुद्धीकरणाबाबत बीड ओॆना पत्र देण्यात आले आहे.
स्वच्छता व पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण आणि आराेग्य विभागाकडून जून महिन्यात जिल्ह्यातील सर्वच गावांचे जलस्राेत, पाणीपुरवठा याेजनांतून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यात १६२९ नमुन्यांपैकी ०.०३ टक्के नमुने दूषित असल्याचे आढळून आल्याचा अहवाल देण्यात आला आहे. त्यात चाळीसगाव, मुक्ताईनगर, पाराेळा, पाचाेरा, रावेर, यावल, बााेदवड, अमळनेर आणि भडगाव या तालुक्यांचा समावेश आहे. भुसावळ आणि चाेपडा या दाेन तालुक्यांत मात्र एकही नमुना दूषित आढळलेला नाही. दरम्यान, जिल्ह्यात ४५ गावांचे पाण्याचे नमुने दूषित असल्याने तेथे साथराेगांची शक्यता असल्याने ग्रामपंचायतींना सूचना करण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय दूषित नमुने गावांची संख्या
अमळनेर ३
भडगाव १
बाेदवड २
चाळीसगाव ५
धरणगाव ३
एरंडाेल ९
जळगाव २
जामनेर ४
मुक्ताईनगर ४
पाचाेरा ४
पाराेळा ४
रावेर ३
यावल तालुका १
जलवाहिनीत गटारीचे पाणी शिरत असल्याचे आले समाेर
जिल्हा परिषदेकडून याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना कळवण्यात आले आहे. पाण्याच्या जैविक तपासणीत दूषित आढळून आलेल्या नमुन्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन लिकेज असल्याचे आढळून आले आहे. पाइपात गटारीचे पाणी शिरणे, गटारीवर असलेल्या खुल्या नळात पाणी जाणे, पावसाळ्यात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत टीसीएल पावडरचा वापर न करणे आदी कारणे या तपासणीच्या माध्यमातून पुढे येताहेत.
गावातच करता येणार पाणी तपासणी, किट वाटप केले
पाण्याच्या प्रयाेगशाळेपूर्वी गावातच तपासणी करण्यासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातर्फे एक किट वाटप केले जात आहे. या किटमधील एका बाटलीत पाणी भरून ते २४ तास अंधारात ठेवावे लागते. पाणी दूषित असल्यास काचेच्या बाटलीतील पाणी गढूळ किंवा काळ्या रंगाचे हाेते. पाणी दूषित नसल्यास पाण्याचा रंग बदलत नाही. गावांना हे किट वाटप करून तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे.
पिवळे कार्ड मिळालेली गावे
भडगाव तालुका : पथराड, पथराड तांडा, पांढरद, नगरदेवळा स्टेशन व गेट, वडगाव नालबंदी, महिंदळे. चाळीसगाव तालुका : पाटणा, बाेरखेडा बुद्रुक. धरणगाव तालुका : बांभाेरी, रेल, सतखेडा, अहिरे बुद्रुक, अहिरे खुर्द, चमगाव, निंभाेरा, चावलखेडा, हणमंतखेडा, खर्दे, कंडारी बुद्रुक. एरंडाेल : आनंदनगर, जवखेडेसीम, रिंगणगाव, कासाेदा. जामनेर तालुका : नागण खुर्द आणि डाेहरी तांडा. जळगाव तालुका : आसाेदा, विदगाव, ममुराबाद, आव्हाणे. रावेर तालुका : गहुखेडा, रायपूर, रणगाव, तासखेडा, सुदगाव. यावल तालुका : डाेंगर कठाेरा, किनगाव, बुद्रुक, कासवा, अकलूद आणि कठाेरा या गावांना पाणीपुरवठ्याबाबतचे पिवळे कार्ड मिळाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.