आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतील ३५ आमदार फोडून एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला. आणखीही काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असून त्यांच्यासह स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी त्यांनी केली आहे. शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजे ३७ आमदारांनी पक्ष सोडला तर त्यांच्या आमदारकीला धोका राहत नाही. याच नियमाचा आधार घेत शिंदे आमदारांचा स्वतंत्र गट तयार करणार आहेत. अल्पमतात आलेले ठाकरे सरकार पायउतार होताच शिंदेंचा हा गट भाजपला पाठिंबा देईल. भाजपचे १०६ व २८ समर्थक आमदार आणि शिंदेंचा गट मिळून सत्ता स्थापन करून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. या बदल्यात शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद व त्यांच्या गटाला ९ ते १० मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती शिंदेंच्या निकटवर्तीयांनी दिली.
अन्यथा मध्यावधीचा पर्याय : एकनाथ शिंदे गट स्थापन करू शकले नाही तर त्यांच्यासह समर्थक आमदार राजीनामे देतील. त्यामुळे ठाकरे सरकार पायउतार होईल व राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यानंतर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात.
विधानसभेचे सध्याचे बलाबल
शिवसेना 55
राष्ट्रवादी 53
काँग्रेस 44
भाजप 106
मनसे 01
एमआयएम 02
प्रहार जनशक्ती 02
अपक्ष 13
शेकाप 01
सपा 02
माकप 01
बविआ 03
स्वाभिमानी 01
इतर 03
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.