आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव वीज बिल:एकनाथ खडसेंनाही वाढीव बिलाचा फटका, महावितरणने पाठवलं 1 लाख 4 हजार रुपयांचं वीज बिल

जळगाव3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात वीज बिलाच्या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना महावितरणाने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. यामुळे सरकरची डोकेदुखी चांगलीच वाढल्याचे चित्र आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला रोष जाहीर केला आहे. आता या यादीत भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचाही समावेश झाला आहे.

भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरामध्ये 1 लाख 4 हजार रुपयांचं बिल लाइट बिल आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा चार महिन्यांचे हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी याविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने ते चकीत झाले. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली आहे.

याविषयी बोलताना खडसे म्हणाले की, लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव आहेत. ही भरमसाठ वीज बिलन भरण्यासारखी असल्याचे ते म्हणाले आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये योग्य नसल्याचे ते म्हणाले. यासोबतच सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली करावी आणि बिलामध्ये सवलत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.