आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील नव्याने होत असलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करणाऱ्या ठेकेदारांना प्रायश्चित्त भोगावे लागेल. त्या रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडीट करण्यात येईल. पाच वर्ष देखभाल,दुरुस्ती करावी लागेल. त्यांची कामांची बीले अडकवून ठेवता येतील असा इशारा आमदार सुरेश भोळे यांनी कंत्राटदारांना आज दिला.
आमदार भोळे म्हणाले, रस्त्यांच्या कामांबाबत आपण स्वत: अनेक तक्रारी केल्या. प्रशासनाने दखल घेऊन कारवाई केली नाही. लोकप्रतिनिधी म्हणून निधी आणण्याची आमची जबाबदारी आहे. चांगले काम करुन घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची व अभियंत्यांची आहे.
शहरात नव्याने होत असलेल्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे आमदार भोळे उत्तर देत होते. शहरात काही ठिकाणी चांगले रस्ते झाले आहेत.मनपा नागरिकांकडून कर घेते. मनपाला २५ कोटींचा निधी खर्च करण्यास किती वर्ष लागले. आता मनपा कर्जमुक्त झाली आहे. नागरिकांकडून कर वसूल करणाऱ्या मनपाने किमान शहरातील रस्त्यांची डागडुजी तरी करावी असे आवाहनही त्यांनी आयुक्तांना केले.शहरातील अमृत योजनेच्या संथगतीबद्दलही प्रशासनाने कंत्राटदारावर कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसात गुड न्यूज देणार...
शहरासाठी शासनाने १००, ७५ आणि ८४ कोटी रुपयांचे तीन प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत. शंभर कोटींचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांमध्ये शहराला ही गुड न्यूज देणार असल्याचेही आमदार भोळे यांनी सांगितले.
बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक होणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे १० एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक,मेळावा व भाजप शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्त सकाळी १०.३० वाजता शहरातून भाजप गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येतील.
स्वातंत्र्यचौकातील सावरकरांच्या पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही आमदार भोळे यांनी सांगितले. आमदार जयकुमार रावल, विजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित राहतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.