आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह उल्लेख प्रकरण:भाजपकडून ही चूक झाली नसावी, चौकशीत तथ्य समोर येईल; 'त्या' प्रकारावर भाजप खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे झाले होता आक्षेपार्ह उल्लेख

भाजपच्या वेबसाईटवर रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावापुढे आक्षेपार्ह उल्लेख दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणावर रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना रक्षा खडसे यांनी झालेल्या प्रकारावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच भाजपकडून ही चूक झाली नसावी, असा दावाही त्यांनी केला.

रक्षा खडसे काय म्हणाल्या?

भाजपच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत मला काल सायंकाळी माहिती मिळाली. माझ्याकडे व्हॉट्सअॅपवर याबाबत जे काही स्क्रीनशॉट आलेत, त्यात हा प्रकार ‘सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी’ या पेजवरुन व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, याबाबत मला माहिती नाही. पण या प्रकाराची पोलीस आणि आमच्या पक्षाकडून चौकशी सुरु आहे. हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत तथ्य समोर येईल” असे रक्षा खडसे म्हणाल्या. ''ही बातमी पाहिल्यानंतर मी भाजपची अधिकृत वेबसाईट चेक केली होती. त्यावेळी मला असा काही प्रकार दिसला नाही. पण काही जणांनी पेजचे स्क्रिन शॉट काढून फोटोशॉपद्वारे असा प्रकार केला असेल, असा माझा अंदाज आहे'' असेही रक्षा खडसे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...