आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ एक संचालक असलेल्या भाजपने शिवसेना शिंदेगटाच्या मदतीने जिल्हा दूध संघापाठाेपाठ तीन महिन्यातच जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार एकनाथ खडसे यांना नाट्यमय घडामाेडीतून धक्का दिला. बँकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत भाजपने वर्षभरापूर्वी झालेल्या बँकेतील एकतर्फी पराभवाचे उट्टे काढले. त्यासाठी त्यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे संजय पवार यांचा राजकीय अस्त्र म्हणून वापर केला. विशेष म्हणजे भाजपच्या या ‘संजयास्त्रा’ची आधीच कल्पना असल्याचा दावा करणारे खडसे पुन्हा बेसावध राहिल्याने राष्ट्रवादीवर ही नामुष्की आेढवल्याने पक्षाचे संचालक नाराज झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजप सत्ताबदलाची एकही संधी साेडणार नाही, याची कल्पना असूनही राष्ट्रवादीचे नेेते आमदार एकनाथ खडसे बेसावध राहिले. या निवडणुकीत अॅड. रवींद्र पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवत पुढच्या वर्षी अध्यक्षपदाचा शब्द मागणाऱ्या संचालक संजय पवार यांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळला. हीच संधी हेरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
यासाठी एक दिवस आधीच १२ संचालक भाजपच्या गळाला लागले हाेेते. यापैकी ११ संचालकांनी प्रत्यक्षपणे संजय पवार यांना मते दिली. राष्ट्रवादीतील जाणकार संचालकांच्या मते विराेधकांची खेळी माहिती असूनही आमदार खडसेंनी प्लॅन बी तयार ठेवला नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत उमेदवारावर एकमत हाेऊ शकले नाही. खडसेंकडून अॅड.रवींद्र पाटील यांचे नाव पुढे अाल्यानंतर काही संचालकांनी विराेध केल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडून करण्यात अाला अाहे. तर जिल्हा बँकेत भाजपचा एकच संचालक आहे. जे संचालक फुटले ते सर्व राष्ट्रवादीचेच असल्याचा दावा यावेळी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी माध्यमांशी बाेलताना केला आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत अॅड. रवींद्र पाटील यांचा पराभव झाला हाेता. त्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आमदार खडसेंच्या बंगल्यावर खलबते अध्यक्ष निवडीपूर्वी सकाळी १० वाजता आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीला संजय पवार यांच्यासह सर्व १० संचालक उपस्थित हाेते. अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डाॅ. सतीश पाटील, संजय पवार, प्रदीप देशमुख, आमदार अनिल पाटील हे संचालक अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने त्यांच्या नावावर चर्चा करण्यात आली.
सावकारेंना गृहीत धरले हाेते : खडसे
महाविकास आघाडीत १५ संचालक आहेत. त्यापैकी काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचा एक व शिवसेनेचा एक संचालक फुटल्याचा आराेप आमदार खडसे यांनी केला. भाजपचे संजय सावकारे यांना आपणच निवडून आणले असून ते आपल्या साेबत राहतील असे गृहीत धरले हाेते असेही खडसे म्हणाले. तर अध्यक्षपदाचे दाेन्ही उमेदवार राष्ट्रवादीचेच हाेतेे. काँग्रेसचे उमेदवार फुटले असा आराेप खडसे कसे करू शकतात. आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. राष्ट्रवादीचेच लाेक खडसेंना सांभाळता आले नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे संचालक विनाेद पाटील, शैलजादेवी निकम यांनी दिली आहे.
मंत्री महाजन, गुलाबरावांची मदत
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला बँकेचे अध्यक्ष हाेण्यासाठी मदत केली आहे. बँकेच्या निवडणुकीत संचालक संजय सावकारेंसह बाहेरून मदत करणारे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण यांचीही मदत झाल्याचा उल्लेख बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.