आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन‎:बिलावल भुट्टो यांच्या फोटोला‎ जोडे मारुन भाजपचे आंदोलन‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जामोद‎ बुलडाणा जिल्हा भाजप युवा मोर्चा तथा‎ तालुका भाजपच्या वतीने पाकिस्तानचे परराष्ट्र‎ मंत्री बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याचा जाहीर‎ निषेध करून त्यांचा प्रतिकात्मक फोटोला‎ जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.‎ त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत‎ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.‎ पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो‎ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या‎ दर्जाची टीका केली. त्याच्या या वक्तव्याचा‎ भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला.‎ त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सर्वत्र संताप‎ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यामुळे‎ पाकिस्तानने जाहीर माफी मागावी अशी‎ मागणी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना‎ दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.‎ यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान‎ विरोधात घोषणाबाजी करीत बिलावल भुट्टो‎ यांच्या फोटोला जोडे मारून तहसील चौकात‎ त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला या‎ आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष‎ सचिन देशमुख, राजेंद्र गांधी, शहराध्यक्ष‎ अभिमन्यू भगत, पंचायत समिती सभापती‎ रामाभाऊ राऊत, अशोक काळपांडे, मोहित‎ सराफ, रामा इंगळे, समाधान डाबेराव, राहुल‎ चिपडे, आकाश हांडे, संजय पांडव, सचिन‎ ठाकरे, अमोल मासाळ, ॲड अनंता मानकर,‎ मोहनसिंग राजपूत सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...