आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध संघ:राष्ट्रवादीमधील सासूच्या विराेधातच आता भाजपची खासदार सून प्रचारात

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात दूध संघाची निवडणूक लढवली जाते आहे. त्यांच्या पॅनलमध्ये त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या उमेदवार असून, त्यांच्या विराेधात भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवार आहेत. भाजपने त्यांच्या पॅनलच्या प्रचारासाठी खडसेंच्या सून असलेल्या खासदार रक्षा खडसेंना प्रचारात उतरवले आहे. त्यामुळे सासूच्या विराेधात सुनेचा प्रचार ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दाेन्ही पॅनलमध्ये दिग्गज उमेदवार असल्याने ही निवडणूक राजकीय वर्तुळात चांगलीच गाजते आहे. मंदाकिनी खडसेंच्या विराेधात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे उमेदवार असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरते आहे. दरम्यान, एका बाजूने आमदार एकनाथ खडसे राष्ट्रवादी पॅनलच्या प्रचारासाठी गावागावात फिरत असताना दुसरीकडे भाजपने खडसेंच्या सून खासदार रक्षा खडसे यांनाच खडसेंच्या पॅनलविराेधात प्रचारात उतरवले आहे. रविवारी खासदार रक्षा खडसे यांनी फैजपूर आणि मुक्ताईनगरात भाजप-शिंदेसेनेच्या पॅनलचा प्रचार केला. प्रचारसभेत त्यांनी भाषणही दिले. त्यामुळे सासू असलेल्या मंदाकिनी खडसेंच्या विराेधात सून म्हणून खासदार रक्षा खडसेंचा प्रचार ही बाब जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...