आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रेशनचा काळाबाजार; 105 क्विंटल धान्य जप्त

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राजमालती नगरातील रेशन दुकानातून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला २ लाख ४५ हजारांवर किमतीचा २०० गाेण्या गहू व तांदूळ पुरवठा तपासणी अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी रेशन दुकानदार महिलेच्या पतीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महेमूद बिस्मिल्ला पटेल (रा. राजमालतीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याची पत्नी खान्देश महिला सोसायटी जळगाव येथील रेशन धान्य दुकानाची अध्यक्ष आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांना दिली. त्यानुसार नायब तहसीलदार विशाल सोनवणे व पुरवठा तपासणी निरीक्षक जगदीश गुरव हे राजमालती नगरात तपासणीसाठी गेले होते. महेमूद पटेल याच्या घरासमोर लाल रंगाचा एमएच-०६, एक्यू-२१२ या क्रमांकाचा ट्रक व एमएच-१९, सीवाय-६०६७ या क्रमांकाची मालवाहू गाडी उभी होती.

बातम्या आणखी आहेत...