आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान‎:रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान; रक्तदाता दिनी रेडक्रॉसमध्ये‎ अनेकांचे स्वेच्छा रक्तदान‎

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ रेडक्रॉस रक्तकेंद्रात जागतिक रक्तदाता ‎दिनानिमित्त रक्तदानाचा कार्यक्रम झाला.‎ यात १८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान ‎केले. यावेळी रक्तदानाचे महत्त्व पटवून ‎ ‎देण्यात आले.‎ कार्यक्रमात एक लहान मुलाची आई ‎असलेल्या दीपाली शांताराम बारी यांनीही पहिल्यांदा रक्तदान करून आनंद व्यक्त‎ केला. तर रेडक्रॉसचे कर्मचारी मंगेश‎ ओतारी यांनी २३ वे रक्तदान केले. त्यांचे‎ रेडक्रॉस चेअरमन विनोद बियाणी यांनी‎ कौतुक केले. रेडक्रॉसचे सह कोषाध्यक्ष‎ सुभाष सांखला यांचा ए.बी. निगेटिव्ह जे‎ स्वत: दुर्मीळ रक्तगट असून त्यांनी‎ आजपर्यंत ६६ वेळा रक्तदान केलेले आहे‎ असे रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार‎ रेदासनी यांनी सांगितले. एका व्यक्तीच्या‎ रक्तदानाने तीन जणांचे प्राण वाचवण्यास‎ मदत होते.

रक्तदानाने आत्मिक‎ समाधान मिळते असे उपाध्यक्ष गनी मेमन‎ यांनी सांगितले. यावेळी डॉ. रितेश पाटील,‎ डॉ. नारायण सूर्यवंशी, रेडक्रॉसचे डॉ.‎ अनिल चौधरी, प्रशासकीय अधिकारी‎ लक्ष्मण तिवारी, रोहिणी काळे, तिलोत्तम‎ जोशी, राजेंद्र कोळी, सुनीता वाघ, अनुश्री‎ लुंड उपस्थित होते. सुभाष सांखला यांनी‎ आभार मानले.‎जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रेडक्रॉसमध्ये रक्तदान करताना महिला.‎ शिबिरात यांनी केले रक्तदान‎ दीपाली बारी, रविकुमार मौर्य, अजय‎ यादव, मंगेश ओतारी, भूषण रडे, निखिल‎ सोनवणे, डॉ. अनंत अट्रावलकर,‎ मोहसीन शेख, योगेश पाटील, अतुल‎ पाटील, धर्मेंद्र पाटील, नितीन महाले,‎ गणेश महाले, गिरीश पाटील, अविनाश‎ पाटील, अमित तडवी, सुजीत माळी,‎ योगेशचंद्र यादव.‎ शिबिरात यांनी केले रक्तदान‎ दीपाली बारी, रविकुमार मौर्य, अजय‎ यादव, मंगेश ओतारी, भूषण रडे, निखिल‎ सोनवणे, डॉ. अनंत अट्रावलकर,‎ मोहसीन शेख, योगेश पाटील, अतुल‎ पाटील, धर्मेंद्र पाटील, नितीन महाले,‎ गणेश महाले, गिरीश पाटील, अविनाश‎ पाटील, अमित तडवी, सुजीत माळी,‎ योगेशचंद्र यादव.‎

बातम्या आणखी आहेत...