आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाळू ठेकेदाराकडून मासिक हप्त्याची आणि वाहनावर कारवाई न करण्यासाठीच्या लाचेची रक्कम वाहनचालक आणि पंटरमार्फत घेणाऱ्या बोदवडच्या तरुणतहसीलदाराला तो जळगावला जिल्हाधिकारी कक्षात जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. बोदवडला या तहसीलदाराच्या तीनसाथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. यात तहसीलदाराचा ध्वनिमुद्रित झालेला आवाज पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आला आहे.
योगेश्वर नागनाथराव टोंपे (३२) असे लाचखोर तहसीलदाराचे नाव असून तो सध्या मुक्ताईनगर गावात राहतो. मूळचा तो देगलूर (जि. नांदेड)येथील रहिवासीआहे. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी टोपे शुक्रवारी जळगावात आला होता.
काळ्या फिती लावून त्याने आंदोलनही केले. नंतर शिष्टमंडळाबरोबर ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जात असतानाच एसीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.एका वाळू वाहतूकदाराच्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी २३ हजार रुपये महिना ठरला होता. ती रक्कम मिळाल्यानंतरही एक डंपर सोडण्यासाठीतहसीलदार टोपेने त्याच्याकडे आणखी १० हजार रुपयांची मागणी केली. ती तडजोडीनंतर पाच हजार करण्यात आली. शिवाय तलाठी मंगेश वासुदेव परिसे (वय३१) यानेही दरमहा तीन हजार रुपयांची मागणी केली होती. असे आठ हजार रुपये पंटर शरद समाधान जगताप (वय २५) मार्फत स्वीकारताना बोदवडला तहसीलदारांचा वाहनचालक अनिल रावजी पाटील (५१), तलाठी मंगेश परिसे आणि पंटर शरद जगताप यांना अटक करण्यात आली.
३० मार्चला तहसीलदारांच्या कक्षात त्यांच्याशी या लाचेसंदर्भात संबंधित वाळू वाहतूकदाराशी झालेले बोलणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या रेकाॅर्डरमध्ये ध्वनिमुद्रित झाले होते. ती लाच प्रत्यक्षात दिली जाताच या चौघांवरही कारवाई करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.