आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी माध्यमाची नफ्याची ‘शाळा’:30 रुपयांच्या ओळखपत्रासाठी उकळले जाते 150 रुपये शुल्क; वर्षभरातच 43 लाखांची कमाई

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जाण्याचे, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र या शाळांवर प्रशासनाचा वचक नसल्याने लूट केली जात असल्याची ओरड होते आहे. संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक मिळेल तसे शुल्क वसूल करतात. ट्यूशन फी, स्पोर्ट‌्स फी, ट्रॅव्हलिंग चार्जेस, युनिफॉर्म चार्जेस, आयकार्डसाठी दुपटीने शुल्क आकारतात. ३० रुपयांच्या आयकार्डसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून १५० रुपये शुल्क आकारले जात आहे. ओळखपत्रांतून या शाळा सुमारे ४३ ला‌खांची कमाई करतात.

भरलेले शुल्क अधिक तर नाही ते जरूर तपासून घ्या
आजकाल खरंच खूप शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून खूप कारणांसाठी विविध शुल्क आकारले जातात. हे शुल्क आकारण्याचे प्रमाण शहरात जास्त दिसून येते. अनेक शाळांत ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क, खेळासाठी शुल्क, शाळा डेव्हलपमेंट शुल्क अशी अनेक प्रकारची शुल्क आकारली जातात. प्रत्येक पालकाने शुल्क भरताना ते कोणकोणत्या कारणांसाठी आपण भरत आहोत ते तपासणे गरजेचे आहे. आपण भरलेल्या शुल्काचा कोठे वापर होतो, त्या शुल्कातून शाळेत शिकत असलेल्या आपल्या पाल्याला काय उपयोग आहे ते सगळं अगोदर माहिती करून घेऊनच शुल्क भरले पाहिजे.

विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदीचा पालकांना आग्रह
इंग्रजी शाळांकडून विविध शुल्काच्या नावाखाली दुपटीने शुल्क आकारले जात आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या वाहनानेच शाळेत यायचे. संस्था सांगेल त्या दुकानदाराकडून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदी करायचे, असे नियम लादले जातात. ३० ते ८० हजारांपर्यंत शुल्क शाळा घेत असताना त्यात प्रत्येक साहित्य व प्रवेश शुल्क हे पाच ते सहा पटीने महाग असते.

पाल्यांना त्रास नको म्हणून तक्रार कुणी देईना
शहरात ४२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यात ३६ हजार ३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येकाकडून शाळा आयकार्ड व स्टेशनरीच्या नावाखाली शुल्क आकारते. आयकार्डसाठी सुमारे दीडशे ते दोनशे रुपये लागतात.

प्रत्यक्षात हे आयकार्डसाठी शाळेला ३० रुपयांचाच खर्च येतो. शहरातील शाळा आयकार्ड बनवण्यासाठी १० लाख ८१ हजार २० रुपयांचा खर्च करतात, मात्र पालकांकडून ५४ लाख ५ हजार १०० रुपये जमा केले जातात.

संख्या जास्त असल्यास खर्च कमी
ओळखपत्रासाठी ३० ते ७० रुपयांपर्यंतचा खर्च लागतो. हजाराच्या संख्येने बनवले तर पाच रुपये कमी होतात. शाळेसाठी ३० रुपयांपर्यंतचे आयकार्ड अधिक बनवले जातात. - अतुल वडनेरे, आयकार्ड व्यावसायिक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...