आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तरंजीत वहिवाट:शेतीची वहिवाट; दुचाकीचा कट रचून दोन कुटुंबामध्ये वाद, एकमेकांवर प्राणघातक हल्ला

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वहिवाटेवरून झालेल्या जुन्या वादानंतर दुचाकीचा कट रचून किरकोळ कारणावरून दोन कुंटुंबियांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाचोरा तालुक्यातील वाघळी गावात सोमवारी रात्री या दोन घटना घडल्या. या प्रकरणी दोन्ही कुंटुंबातील 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

रमेश विक्रम पाटील (वय 52) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतीच्या वहीवाटेवरुन असलेल्या जुन्या वादातून सोमवारी रात्री 8 वाजता त्यांच्या घराबाहेर कुणीतरी शिवीगाळ करीत होते. बाहेर गोंधळाचा आवाज ऐकल्यानंतर पाटील यांनी घराबाहेर जाऊन जाब विचारला. यावेळी भाऊसाहेब भिकारी पाटील हा त्यांच्या अंगावर धाऊन आला. ‘तुम्ही नेहमी आमच्याशी भांडण करत असतात, आज तुमचे कुटुंब संपवुन टाकतो अशी धमकी देखील दिली.

रुग्णालयात उपचार सुरू

भाऊसाहेबसह महेंद्र पाटील, नाना पाटील, गजेंद्र पाटील, योगेश पाटील, कृष्णा पाटील, आधार पाटील, महिपाल पाटील, पंकज पाटील व हर्षल पाटील यांनी हातात लाठ्या-काठ्या, चॉपर घेऊन रमेश पाटील यांच्यासह कुटुंबावर हल्ला केला. यात रमेश पाटील, मल्हारी पाटील, पुंडलिक पाटील, अनिल पाटील, सुदाम पाटील, सुनिल पाटील व रोशन पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुन्हा दाखल

दुसरी तक्रार कृष्णा पाटील यांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलास रमेश पाटील यांच्या कुटुंबातील एकाने दुचाकीचा कट रचला. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता, मनोज पाटील, अनिल पाटील, सुदाम पाटील, सुनिल पाटील, रमेश पाटील, पुंडलिक पाटील, रमेश विक्रम पाटील, मल्हारी पाटील व रावसाहेब पाटील यांनी हल्ला केला. यात कृष्णा पाटील यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. या दोन्ही प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी संशयितांची धरपकड सुरू झाली.