आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वत: विकत घेऊन ग्रंथ वाचले पाहिजेत; पुस्तक भिशीत कवी प्रा. वा. ना. आंधळे यांचा सल्ला

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजुनही विकत घेऊन काव्यसंग्रह पाहिजे त्या प्रमाणात वाचले जात नाहीत हे वास्तव आहे. हे चित्र बदलण्यासाठी ग्रंथवाचन ही लाेकचळवळ व्हावी, असा सल्ला कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी एरंडाेल येथे दिला. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संलग्न शाखा एरंडोल आयोजित दत्त काॅलनीतील पुस्तक भिशी कार्यक्रमात ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी पुस्तक भिशीचे संस्थापक तथा जिल्हाप्रमुख विजय लुल्हे उपस्थित होते. सारबेटे हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र सुर्यवंशी यांनीही विचार मांडले.

पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. उज्ज्वला राठी यांनी केले. ‘अनमोल भेट बालकविता संग्रहांची’ अभियानांतर्गत माया धुप्पड लिखित १७ पुस्तकांचा संच एरंडोल शाखेच्या समन्वयिका अंजुषा विसपुते व शारदा पाटील, प्रा. मिना पवार यांना सुपूर्द करण्यात आला. भेट मिळालेली पुस्तके स्वाती काबरा व नगरसेविका जयश्री पाटील यांना देण्यात आली. साहित्यिक माया धुप्पड यांच्या ‘मनमोर’ काव्यचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नप्रभा आंधळे यांनी केले. श्रीलेखा सोनी, स्वाती काबरा उपस्थित होते. सूत्रसंचालन संयोजिका शारदा पाटील यांनी केले.

कवी आंधळे म्हणाले, शिक्षणातलं काव्य गेलं
पूर्वीच्या कविता संस्कार, ताकद व विचारवैभव देणाऱ्या होत्या. शिक्षकांनी समर्पणशील भावपूर्ण अध्यापनाने कवितांचे हृदयावर गोंदण केले म्हणून आजही त्या कविता संपूर्ण मुखोद्गत आहेत. इयत्ता चौथीत शिकताना कुंभार गुरुजींनी साभिनय भावानुकूल शिकवलेली ‘धरु नका ही बरे, फुलावर उडती फुलपाखरे’ ही कविता ठेका धरायला लावते.शिक्षणातलं काव्य, जीवनातलं नाट्यही गेलं. रसिक पुस्तके विकत घेऊन वाचत नाहीत ही खंत आहे. “पप्पा माझ्या आईला बोलू नका’ या कवितेने मानमरातब दिला.

बातम्या आणखी आहेत...