आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावरचे दूध:बाळाला सहा महिन्यांपर्यंत अंगावरचे दूध पाजा;लघुनाटिकेतून मातांना संदेश

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मातेने बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत त्याला दूध पाजलेच पाहिजे. बाटलीने कधीच दूध पाजू नका. प्रत्येक बाळंतीण मातेची काळजी घेण्याचे काम घरातील ज्येष्ठ स्त्रीचे आहे. बाळंतिणीच्या आहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असा संदेश वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी बाळंतीण माता व त्यांच्या नातेवाइकांना “मी आई” या लघुनाटिकेतून दिला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवांतर्गत जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त ‘मी आई’ ही लघुनाटिका सादर करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगिता बावस्कर होत्या. विद्यार्थी, डॉक्टर्स, कर्मचारी यांना स्तनपान समर्थनाची शपथ देण्यात आली. सहा महिने अंगावरील दूध पाजल्यानंतर प्रत्येक मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला आहार सुरू करावा, असे सांगून मातेने बाळाला दूध पाजताना कसे धरावे, दूध पाजण्याच्या पद्धती, आई व नातेवाइकांना असणाऱ्या चुकीच्या समजुती याविषयी लघुनाट्यात विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला. सूत्रसंचालन डॉ. गणेश लोखंडे यांनी तर आभार डॉ. डॅनियल साजी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...