आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • 5 Thousand Bribe For House Registration In Jalgaon | Deputy Registrar, Assistant Co operation Officer Arrested By Bribery Prevention Department

घर नोंदणीसाठी 5 हजारांची लाच:उपनिबंधक, सहायक सहकार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील सिंधी कॉलनीतील घराची नोंद करून पावती देण्याच्या मोबदल्यात सहकारी संस्था तालुका जळगावचा उपनिबंधक वर्ग 3 व सहायक सहकार अधिकाऱ्याने नागरिकाकडे 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. हे व्हाइस रेकॉर्डिंगव्दारे सिध्द झाल्यानंतर मंगळवारी दुपारी 12.30 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेतले आहे. या कार्यालयात सहा महिन्यात एसीबीच्या पथकाने ही दुसरी कारवाई केली.

नेमके प्रकरण काय?

विजय सुरेशचंद्र गोसावी (वय 54 रा. आशाबाबानगर) असे त्या उपनिबंधकाचे तर चेतन सुधाकर राणे (वय 48, रा. प्लॉट नं 141, गणेश कॉलनी) असे सहायक सहकार अधिकाऱ्याचे नाव आहे. तो सहायक निबंधक सहकारी संस्था रावेर येथे कार्यरत होता. तो प्रतिनियुक्तीवर उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव तालुका येथे आलेला आहे. तक्रारदाराने जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत घर खरेदी केलेले होते. त्या घराची दप्तरी नोंद घेऊन त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात दोघांनी 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या संदर्भात नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

अन् पुरावाही मिळाला

तक्रारीनुसार 18 मे रोजी 5 हजार रुपयांची पुन्हा मागणी केली होती. ही मागणी एसीबीच्या डिव्हाइसमध्ये रेकॉर्ड झालेली होती. सोमवारीही एसीबीच्या पथकाने सहकारी संस्था जळगाव तालुका कार्यालयात सापळा लावला. मात्र, त्यांनी लाच न स्विकारल्याने सापळा यशस्वी होऊ शकला नाही. लाचेची मागणी केल्याचा पुरावा असल्याने मंगळवारी दुपारी एसबीच्या पथकाने सहकारी संस्था जळगाव तालुका कार्यालयात जावून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, ईश्वर धनगर यांच्या पथकाने केली. दोघांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...