आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वऱ्हाडींचा बहुगलबला भोवला:वर-वधूला 50 हजार रुपये दंड, चाळीसगावात कारवाई; नगरसेवकासह तिघांवर गुन्हा दाखल

पाचोरा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवाह सोहळ्यात कारवाई करताना पोलिस, महसूल व पालिकेचे पथक.

शहरात नियमाचे पालन हाेत अाहे किंवा नाही यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यास फरफटत ओढून नेत, शिवीगाळ व त्याचा मास्क काढून पोलिसांसमोर जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगरसेवकासह तीन भाजीपाला विक्रेत्यांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला. पालिका प्रशासनाने राजेंद्र उर्फ अनिल वाघ यांच्यासह तीन कर्मचारी नियुक्त केले अाहेत. २६ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरसेवक रफिक बागवान हा तोंडावर मास्क न बांधता भाजीपाला विक्री करत हाेता. त्यास वाघ यांनी मास्क लावण्यास सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी अनिल वाघ, राजेश कंडारे, पोलिस उपअधीक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, प्रकाश पाटील, सुनील पाटील, विजयसिंग पाटील हे २८ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपस्थित हाेते.

त्या ठिकाणी नगरसेवक रफिक बागवान, महिद बागवान यांनी राजेंद्र वाघ यांचा हात धरून युसूफ बागवान याच्यावर कारवाई का केली? अशी विचारणा केली. युसूफ बागवान याने वाघ यांनी कारवाई केल्याचे सांगताच नगरसेवक बागवान याने वाघ याच्या तोंडावरील मास्क व हातातील पावती बुकही फेकून दिले. तसेच तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली. यावेळी सहाय्यक फौजदार जगताप, पाटील यांनी वाघ यांना साेडवले. वाघ यांच्या फिर्यादीनुसार नगरसेवक रफिक बागवान यांच्यासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

जामनेरात आठ दिवसांत २१ दुकाने सील
जामनेर । नियमांचे उल्लंघन करून अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडणाऱ्यांवर पालिका व पोलिस प्रशासनातर्फे कारवाई केली जात आहे. अशी २१ दुकाने पालिकेच्या पथकाने गेल्या आठ दिवसात सील केली आहेत. प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने सील करून दंड वसूल करण्याचा धडाका पालिका प्रशासनाने सुरु केला आहे. यात काही नगरसेवक, राजकीय पदाधिकाऱ्यांच्याही दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे मुख्याधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होतात. मात्र, दबावाला न जुमानता मुख्याधिकारी राहूल पाटील व त्यांचे सहकारी व पोलिस कारवाई कारवाई करत आहेत.

आयोजकांनी समाजभान राखावे : मुख्याधिकारी
सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशा बिकट परिस्थितीत यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने निर्बंध लावले असून गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनीदेखील शासनाच्या निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन चाळीसगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

पाचाेरा पालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभांवर निर्बंध घालण्यात अाले अाहेत. केवळ २५ जणांच्या उपस्थितीतच विवाह समारंभांना परवानगी दिली जाते. मात्र, शहरालगत घाटरोडवरील एका लॉनमध्ये विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक वऱ्हाडी आढळल्याने, बुधवारी वर-वधूला ५० हजार रुपयांचा दंड ठोवण्यात आला. तसेच संबंधित लॉन चालकावरही गुन्हा दाखल झाला.

घाटरोडवरील हॉटेल कमलशांती येथे बुधवारी (दि.२८) नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती पथकाला मिळाली होती. शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील, महसूल विभागाचे शैलेश रघुवंशी यांच्यासह पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जाधव, कुणाल महाले. प्रविण तोमर, जितेंद्र जाधव, सुमीत सोनवणे यांच्या पथकाने विवाहस्थळ गाठले. त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित वर-वधूला पथकाने ५० हजार रुपयांचा दंड केला.

बातम्या आणखी आहेत...