आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:नववधूंची घागऱ्यावर मॅचिंग नेलआर्टला पसंती ; पाेकेमाॅन्सचा फीव्हर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लांब नखं ठेवणे प्रत्येक मुलीला आवडते. खास करून लग्न ठरल्यानंतर मुली लहान नखे मोठे करायला सुरुवात करतात. ट्रेंड पाहिला तर लांब नखांना सिंपल किंवा डबल शेडमध्ये नेलपेंट लावण्याची फॅशन आता गेली. आजकाल डिझाइनवाले नेलआर्ट मुलींना अधिक पसंत आहेत. जे फक्त नखांना नाही तर नववधूच्या लुकला ग्रेसफुल बनवतात.

लग्नात नववधू स्पेशल नेलआर्ट आणि नेल एक्स्टेंशन करण्याकडे कल वाढला असून, या सीझनमध्ये ७० टक्के नववधूंनी मेंदी आणि घागरा यांना मॅचिंग करेल असे नेल एक्स्टेंशन बनवून घेतले आहे. यासाठी १० हजारांपर्यंतचा खर्च केला आहे. सौंदर्यसाधनेत नखांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे नेलपेंट हा मुलींच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. नखांच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नेलपेंटच्या विविध शेड सोबत नेलआर्टचीही चलती आहे. नखांवर कलाकुसर करणे हे नेलआर्टमध्ये येते.

नेल आर्ट‌्स तयार करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे स्टीकर्स व ग्लिटरी कलरही उपलब्ध आहेत. या नेलआर्टची तरुणींत मोठ्या प्रमाणावर क्रेझ दिसून येत आहे. नखं लांब नसतील तर अॅक्रिलिक नेलकीट खरेदी करून ही समस्या सोडवता येते. विशेषतः पार्टी अथवा विशेष समारंभासाठी ही मदत योग्य ठरते. अॅक्रिलिक नखं लावून नखांचं सौंदर्य वाढवता येत. नखं लावल्यावर ते तीन आठवडे अगदी जसेच्या तसे राहू शकते.

समारंभासाठी जरा हटके सण-समारंभात सध्या मॅट नेलपेंटची क्रेझ आहे. यात मॅट कलरवर ग्लिटरी कलरने आर्टवर्क करतात. स्माइली हा आर्ट प्रकार अधिक पाहायला मिळतो. हे आर्ट प्रकार आर्ट तयार करण्यासाठीचे साहित्य ५० ते ८० रुपयांपर्यंत मिळते. लग्नसमारंभासाठी स्टोन, डायमंडचे साहित्य हे महाग येते.

स्टायलिशची वाढती क्रेझ नेल आर्टमध्ये स्माइल, डिझाइन्स, हार्टशेप, पोलका, मोझॉक, चेक्स, ग्लिटरी मून लाइटचा फील देणारी नेल आर्ट सध्या बघायला मिळते. पोकेमॉन्सचा चांगलाच फीव्हर दिसून येत असून, मुलींच्या नखांवरही पोकेमॉन अवतरू लागले आहे. नखांवर रंगीबेरंगी पोकेमॉन काढून मुली ते मिरवताना दिसतात.

रियुझेबलला अधिक पसंती लग्न व समारंभासाठी नेलआर्ट आणि नेल एक्स्टेंशन करण्याकडे मुलींचा कल वाढला असून, ४०० रुपयांपासून तर १० हजारांपर्यंत हे तयार करून दिले जात आहे. यात रियुझेबलला अधिक पसंती आहे. आता समारंभासाठी नेलआर्टझसला अधिक पसंती मिळू लागली आहे. - करिश्मा गोधवानी, नेलआर्टिस्ट

बातम्या आणखी आहेत...