आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातून जाणाऱ्या साडेसात किलाेमीटर अंतराच्या चाैपदरी महामार्गावर पथदिव्यांसाठी मार्च २०२१मध्ये तीन काेटींचा निधी मिळाला हाेता. त्यातून वर्षभरापूर्वी कामाला सुरुवात झाली. मात्र, महामार्ग प्राधिकरण व महापालिकेत समन्वय नसल्याने त्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. दरम्यान, चार किमीपर्यंतचे पथदिवे उभारून तीन महिले लाेटले गेले हाेते. पण, ते सुरू केले जात नव्हते. ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर यंत्रणा हलली आणि रविवारी सायंकाळी पथदिवे लाेकार्पणाचा मुहूर्त लागला. महामार्गावर पथदिव्यांचा लाेकार्पण साेहळा ७.४७ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आकाशवाणी चाैकातील हायमास्ट लॅम्पचे स्वीच आॅन करून झाला.
उर्वरित ठिकाणी मनपाने घेतलेल्या वीज कनेक्शनच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी बटण सुरू करून इतर पथदिवे सुरू केले. त्यापूर्वी महापाैर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांच्या हस्ते पूजा झाली. आमदार सुरेश भाेळे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. माजी महापाैर नितीन लढ्ढा, ललित काेल्हे, माजी उपमहापाैर अश्विन साेनवणे, शिवसेना जिल्हा प्रमुख नीलेश पाटील उपस्थित हाेते.
अखेर पहिल्या टप्प्याचे काम झाले पूर्ण
निविदेत असलेल्या ३८८ पैकी ३५१ पथदिवे उभारण्यात आले आहे. त्यासाठी १७ ठिकाणाहून वीजजाेडणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात रविवारी कालिंका माता चाैक ते आकाशवाणी दरम्यानच्या पथदिव्यांचे लाेकार्पण हाेणार हाेते. मात्र, त्यात वाढ करून शिवकाॅलनीपर्यंतचे पथदिवे सुरू करण्यात येत आहेत.त्यामुळे तीन वर्षांनी का असेना पण महामार्गावरील काळाेख मिटताे आहे.
सर्व दिवे लागतील
पथदिव्यांसाठी उभारलेल्या काही पाेलच्या ठिकाणी वीज कनेक्शन पाेहाेचलेले नाही असे पथदिवे पुढील आठवड्यात पूर्ण केले जातील. असे महापालिकेचे वीज अभियंता एस.एस. पाटील यांनी सांगितले. ३८८ नियमित पथदिवे प्रस्तावित आहेत. त्यासाेबत तीन प्रमुख चाैकात २० मीटर उंचीचे तीन हायमास्ट व लहान चाैक, जाेड रस्त्यांवर १० ठिकाणी १२ मीटर उंच मिनी हायमास्ट बसवण्यात येताहेत असे यावेळी सांगितले गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.