आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंदाजपत्रक:खड्डे बुजवण्यासाठी चार काेटींचे अंदाजपत्रक

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे शहरात नवीन रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी तजवीज केली जात आहे. येत्या महासभेत प्रभाग समितीनिहाय प्रत्येकी एक काेटी रुपये असे चार काेटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेतली जाणार आहे. एेनवेळी टेंडर प्रक्रिया व वर्कआॅर्डर देण्याच्या कटकटीतून प्रशासन आतापासून मुक्त हाेईल.

शहरातील रस्त्यांची समस्या तापदायक झाली आहे. गेली तीन वर्ष अमृत याेजनेच्या कामांमुळे आेरड सुरू हाेती. आता अमृत याेजनेचे काम अंतिम टप्प्यात असतानाही रस्त्यांच्या कामांना सुरूवात हाेत नसल्याने आेरड आहे. ३८ काेटी असाे की ६२ काेटींचा निधी यातील अनेक रस्त्यांची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. पालिका प्रशासनाकडून रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी एकीकडे प्रयत्न केले जात आहेत; परंतु दुसरीकडे त्याच शासनाकडून आगामी वर्षभरात रस्त्यांवर हाेणारे खड्डे बुजवण्यासाठी आतापासून व्यवस्था करून ठेवण्यावर भर दिला जाताेय.

बातम्या आणखी आहेत...