आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगोळ्या घालून पुष्पवृष्टी:देऊलवाडेत उमेदवारांची बैलगाडीतून मिरवणूक

नशिराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देऊलवाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुकेश सोनवणे यांच्या ग्रामविकास पॅनलने सात पैकी चार जागांवर विजय मिळवला. सरपंचपदी निकिता मुकेश सोनवणे तर सदस्य अवंताबाई छन्नू सोनवणे, राजेंद्र बळीराम सोनवणे, इंदुबाई संतोष सोनवणे यांचा विजय झाला आहे. विजयानंतर ग्रामस्थांनी गावात ठिकठिकाणी रांगोळ्या घालून पुष्पवृष्टी करून विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करून बैलगाडीवर मिरवणूक काढली.

मिरवणुकीत गावात ठिकठिकाणी विजयी उमेदवारांचे महिलांनी औक्षण केले. प्रतिभा पाटील, कडू पाटील, खुशाल सोनवणे, उत्तम सोनवणे, देविदास सोनवणे, रामचंद सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे व ग्रामस्थांनी या बैलगाडी मिरवणुकीचे आयोजन केले हाेते.

बातम्या आणखी आहेत...