आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका आणि पाेलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून फुले मार्केटमध्ये हाॅकर्सची दादागिरी वाढली आहे. दुकानांसमाेर अतिक्रमण करून गाळेधारकांनाच दमदाटी करण्याचे प्रकार सर्रास वाढले. त्यातून हाेणारे वाद आणि शिवीगाळ व दादागिरीला कंटाळलेल्या महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील सुमारे १२०० गाळेधारकांनी दुकाने बंद ठेवत महापालिकेवर गुरुवारी माेर्चा काढला.
प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच अतिक्रमण फाेफावले असून, आठवडाभरात हाॅकर्सचा बंदाेबस्त न केल्यास बेमुदत बंदचा इशारा दिला. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या फुले मार्केट म्हणजे खरेदीपेक्षा वादावादीचे व गाेंधळाचे ठिकाण अशी नवीन आेळख निर्माण झाली आहे.
जागा मनपाची अन् भाडे गुंडांना
महापालिका मालकीच्या फुले मार्केटमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लाेकांचा धुमाकूळ आहेे. दुकानांसमाेरील जागांवर गुंडांनी ताबा मिळवला आहे. पालिकेची जागा असताना आपल्याच मालकीची असल्याचा आव आणला जाताे. तसेच त्या जागांवर व्यवसाय करण्यासाठी हाॅकर्सकडून २० ते ४० हजार रुपये भाडे आकारले जाते. या बाबी मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाेलिसांनाही माहिती आहे पण दखल घेतली जात नाही.
नाे-हाॅकर्स झाेनची अंमलबजावणी करा; उपायुक्तांना घातले साकडे
मार्केटमध्ये गाळेधारकांच्या दुकानासमाेरच हाॅकर्सचे टेबल लावले जात आहेत. विराेध केल्यास हाॅकर्स एकत्र येऊन शिवीगाळ करतात, दबाव आणतात, मारहाणीची धमकी देतात असे गाळेधारकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या मानगुटीवर हाॅकर्सचे भूत कायम आहे. मनपाने नाे-हाॅकर्स झाेनची अंमलबजावणी करावी. हाॅकर्सला मार्केटमधून हद्दपार करावे, अशी प्रमुख मागणी केली. संघटनेचे पदाधिकारी नगरसेवक मनाेज आहुजा, रमेश मतानी, राजेश वरयानी, बबलू समदडिया, देवराज वरयानी, प्रदीप हाेतचंदानी, सतीश गेही यांच्यासह शेकडाे हाॅकर्सने उपायुक्त चाटे यांना निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.