आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाेराेना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींचा दफन विधीचा खर्च ईदगाह ट्रस्टने केला नव्हता. असे असतानाही दफन विधीच्या खर्चाची बिले सादर करून १ लाख ९४ हजारांची बिले घेतल्याप्रकरणी जनरल सेक्रेटरी फारुख शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध तक्रार दाखल आहे. यात महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याने बिलाची रक्कम सात दिवसांत परत करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे. काेराेनामुळे बाधित हाेऊन मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीवर अंत्यसंस्काराची जबाबदारी मनपावर साेपवण्यात आली हाेती. यासाठी नेरीनाका स्मशान व मुस्लिम कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येत हाेता. यासाठी मुस्लिम समुदायाचे मृत्यू झालेल्या ६९० जणांवर दफनविधी करण्यात आले आहेत. प्रति व्यक्ती १७५० रुपये दफनविधीचा खर्चासाठी मनपाकडे मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुख शेख अब्दुल्ला यांनी मनपाकडे मागणी केली हाेती. त्यानुसार मनपाने १११ व्यक्तींसाठी १ लाख ९४ हजार २५० रुपये अदा केले हाेते.
शेख यांना महापालिका प्रशासनाने बजावली नाेटीस
मनपाच्या आराेग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी फारुख शेख अब्दुल्ला यांना २८फेब्रुवारी राेजी नाेटीस पाठवली आहे. त्यात पाेलिसांच्या अहवालानुसार मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेख यांनी घेतलेली १ लाख ९४ हजार २५० रुपये ७ दिवसांत मनपात जमा करावे अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.