आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मोबाईलमधील गाण्यांचा आवाज हळू कर, व्यवस्थीत टिकीट घे’ असे बोलल्याचा राग आल्याने एका तरुणाने महिला बस कंडक्टरसह भांडण सोडविण्यास आलेल्या बसचालकाला देखील मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार 4 जानेवारी रोजी घडला आहे. या प्रकरणी गुरूवारी अडावद पोलिस ठाण्यात रतीक जुलाल बागुल (वय 23, रा. पिंप्री ता. चोपडा) या याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या संदर्भात 45 वर्षीय महिला कंडक्टरने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.4 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कमळगाव बस स्थानकावर बसमध्ये बसल्यावर रतीक बागुल हा तरुण महिला कंडक्टरकडे बघून मोबाईलमध्ये जोर-जोराने गाणी वाजवत होता. महिला कंडक्टरने आवाज कमी कर, असे रतिकला सांगितले. तरी देखील तो महिला कंडक्टरकडे एकटक पाहत होता. रतिकने महिला कंडक्टरला बसच्या खाली ढकलून मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यास आलेले बसचालक यांना देखील रतिकने चापटा चुक्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.
सहप्रवाशांनी रतिकला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काही एक ऐकून घेतले नाही. अखेर महिला कंटक्टरने अडावद पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार रतिकच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुरूवारी रतिकला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. रतिकला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.