आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्याचे दिवस:‘गुरुपुष्यामृत योग’ अमावास्येला असला तरी सोन्याची खरेदी शुभ

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते; परंतु गुरुवारी अमावास्या असली तरी सोने खरेदी शुभ आहे, असे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले.सोन्याच्या दागिन्यांचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यातही मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने सोन्यात वृद्धी होते असे मानणारा माेठा वर्ग आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. लग्नसराईचा जोर जवळपास कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर सराफा बाजारातील उलाढालीचा टक्का घसरला आहे. ऑगस्ट हा व्रतवैकल्यांचा महिना आहे. त्या कालावधीत सराफा बाजारातील उलाढाल वाढण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. चांदीच्या भावातील चढ-उतार सुरूच लग्नसराई मंदावली आहे. त्याचा परिणाम सराफा बाजारातील खरेदीवर होतो आहे. जळगावात १ जुलै रोजी चांदी ६२ हजार रुपये किलो होती. मात्र, त्यात सातत्याने घसरण होत गेल्याने २७ जुलै रोजी हे दर ५५ हजार ३०० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. सोन्याचे दरात किंचित चढ-उतार सुरू आहे. १७ जुलैला सोने प्रतितोळा (१० ग्रॅम) ५१ हजार रुपये होते. हे दर बुधवारी ५१ हजार ३०० रुपयांवर होते. अर्थात, गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत सोन्याचे दर हे ३०० रुपयांनी वाढले. महिनाभर हा चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...