आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातांबापुरा परिसरातील भिलाटी वस्तीतील अनिता पंडीत तांबे व नेहा संतोष जमदाडे या दोघींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मात्र, शिकण्याची जिद्द त्यांच्यात प्रचंड आहे. साड्यांवर टिकली वर्कची कामे करून जी मजुरी मिळायची त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी शिक्षण घेतले. यंदा बारावीच्या परीक्षेत या दोघी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. वर्धिष्णू संस्थेतर्फे शहरातील विविध वाडे, वस्त्यांमध्ये या घटकातील विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी चालवण्यात येत असलेल्या ‘आनंदघर’ या शैक्षणिक केंद्राला या दोन्ही जुडल्या. दोघांनाही ‘आनंदघर’ने पाचवीपासूनच मदतीचा हात दिला. संगणक कोर्ससह अभ्यासासाठी पुस्तके व गरजेनुसार मदत करून त्यांचे शिक्षण सुरु ठेवले. वस्ती परिसरातील वातावरण, कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीला तोंड देत शिक्षणाचा उत्साह कायम ठेवला. दोघांचेही वडील सफाई कामगार, हातमजुरी करतात. दोघींनी साड्यांना टिकली, चमकदार खडे लावण्याचे काम केले. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्या मेहरूणमधील कौतिक महाजन माध्यमिक विद्यालयात बारावीपर्यंत शिकल्या. बारावीत कला शाखेत अनिताने ६८ तर नेहाने ६३ टक्के गुण मिळवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.