आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे:सीएचा अभ्यासक्रम बदलणार; पुढील वर्षापासून प्रात्यक्षिकांवर भर, सीए काचवालांची माहिती

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीए अभ्यासक्रमात पुढील वर्षापासून बदल करण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दोन वर्षांची आर्टिकलशिप करावी लागणार आहे, अशी माहिती द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग चेअरमन सीए मुर्तुझा काचवाला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या बरोबरीने आपला अभ्यासक्रम असावा अशी रचना केली जाते आहे. नवीन अभ्यासक्रमाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच ताे लागू केला जाईल. भारतीय राज्यघटनेवरील पेपर प्रथमच अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहेत. फाउंडेशन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल लर्निंग हबवर अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आर्थिक ताळेबंद सीएच्या स्वाक्षरीखाली यूडीआयएम क्रमांक द्या, त्याची ऑफलाइन पडताळणी करता येते. यामुळे चुकीचे प्रकार टाळण्यात येतात. चुकीचे प्रकार करीत असलेल्या सदस्यांविरुद्ध कमिटीकडे तक्रार आल्यास सदस्याचे निलंबन, डिबार किंवा अर्थिक दंडाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान, मुंबईत वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट आयोजित करण्यात आली आहे. यात ११० देशातून विद्यार्थी, सीए उपस्थित राहणार आहेत असेही काचवाला यांनी सांगितले. श्वेता जैन, पीषूय चांडक, पिंकी केडिया, विक्की बिर्ला, अभिषेक कोठारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...