आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक कारण:सुरत ते भुसावळ पॅसेंजर ट्रॅकवर येण्याआधीच रद्द;  रेल्वे विभागाने दिले तांत्रिक कारण

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनामुळे अडीच वर्षांपासून बंद असलेली सुरत-भुसावळ पॅसेंजर पश्चिम रेल्वेने बुधवारपासून पुन्हा (८ जून) सुरू करण्याची घाेषणा केली होती. मात्र, ही गाडी सुरू होण्याआधीच अनिश्चित काळासाठी रद्द केली. त्यामुळे खान्देशातील व्यापारी, उद्योजक, चाकरमानी व सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले. गाडी क्रमांक १९००५ सुरत-भुसावळ पॅसेंजर ही ८ जून रोजी रात्री ११.१० वाजता सुरत स्थानकातून सुटणार होती. दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी ७.५५ वाजता भुसावळ स्थानकात पोहोचणार होती. मात्र, ही गाडी सुरत स्थानकातून सुटण्याआधीच रद्द केल्र्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. गाडीबाबतची माहिती ऑनलाइन सिस्टिममधून काढून टाकल्याने कुठेही बुकिंग झाले नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात येत आहे. खान्देशातून सुरतकडे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, अनेकांनी ऑनलाइन व तिकीट खिडकीवरून बुकिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, किती लोकांनी बुकिंग केले याची आकडेवारी मिळू शकली नाही.

पत्रात कारण नमूद नाही
सुरत-भुसावळ-सुरत ही पॅसेंजर गाडी सुरू होणार होती. मात्र, पश्चिम रेल्वेकडून पत्र प्राप्त झाले आहे. पुढील आदेशापर्यंत ही गाडी सुरू केली जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. गाडी रद्द करण्याचे काहीही कारण पत्रात नमूद नाही.
- बी. अरुणकुमार, मंडळ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ

गाडी पूर्ववत सुरू करा
सुरत-भुसावळ-सुरत पॅसेंजर खान्देशातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, चाकरमानींसाठी महत्वाची आहे. पुन्हा ती सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी व रेल्वे बाेर्डाकडे पाठपुरावा करू. तसेच लोकप्रतिनिधींना साकडे घालू.
- राजेश भराडे, रेल्वे प्रवासी मंच

प. रेल्वेकडे पाठपुरावा
सुरत-भुसावळ-सुरत पॅसेंजर सुरू करावी अशी मागणी केली आहे. वेळापत्रकाचे नियोजन केले जाते आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे विभागाशी चर्चा केली असता मिळाली. मात्र, असे असले तरी ही गाडी तातडीने सुरू व्हावेे यासाठी रेल्वे बाेर्डाकडे पाठपुरावा करू.
-रवींद्र पाटील, सदस्य, डीआरयुसीसी

बातम्या आणखी आहेत...