आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीस पात्र ठरलेल्या राज्यातील २१७ अभियंत्यांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. जलसंपदा व सार्वजनिक विभागाचे इतर विभागात जागा असताना नियुक्तिपत्रांची प्रतीक्षा उमेदवार करत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक दडपणाखाली आहेत.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल १२ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. अनेक वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले तरीही अद्याप नियुक्ती मिळाली नाही. मधल्या काळात कोरोना असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
सन २०२०मध्ये ही परीक्षा झाल्यानंतर त्याचा निकालही वेळेवर लावला गेला नाही. आता निकाल लावून सुद्धा उमेदवारांना त्यांची नियुक्तीपत्रे देण्यासाठी राज्य शासनाकडे वेळ नाही. नियमाप्रमाणे निवड जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देणे बंधनकारक आहे.
तरीही राज्य सरकारकडून उशीर होत आहे. शासनाच्या २८ ऑगस्ट २०१७च्या शासन निर्णयानुसार निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादी जाहीर झाल्याच्या तीन महिन्याच्या आत नियुक्तीपत्र पाठवणे बंधनकारक आहे. शासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे चित्र समाेर येते अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.