आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:एकाच ट्रॅक्टरला दोन‎ ट्रॉल्या जोडून ऊस वाहतूक‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ भुसावळ-यावल रस्त्यावर गेल्या‎ महिन्यापासून एकाच ट्रॅक्टरला दोन‎ ट्रॉल्या जोडून त्यातून उसाची‎ वाहतूक सुरू आहे. मात्र, रात्री‎ अनेकवेळा या दोन्ही ट्रॉली रस्त्यावर‎ अंधारात उभ्या असतात. त्यामुळे‎ अपघात होऊ शकतो.‎ विशेष म्हणजे अनेक ट्रॉल्यांना‎ मागून रिफ्लेक्टर किंवा रेडीअम‎ लावलेले नाहीत. त्यामुळे मागून‎ येणारे वाहन धडकून अपघात होऊ‎ शकतो.

गेल्या बुधवारी रात्री अंजाळे‎ गावाजवळील उतारावर दोन्ही‎ ट्रॉल्या रस्त्यात आडव्या झाल्याने‎ रात्री उशिरापर्यंत अवजड वाहनांची‎ वाहतूक बंद हाेती. केवळ दुचाकी व‎ लहान वाहनांची ये-जा सुरू होती.‎ अवजड वाहनधारकांना थंडीत‎ रस्त्यात अडकून पडावे लागले हाेते.‎ पोलिस प्रशासनाने एखादी विपरीत‎ घटना घडण्यापूर्वी हा प्रकार राेखवा‎ अशी मागणी परिसरातील‎ नागरिकांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...