आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:रामदेववाडीजवळ कार-दुचाकी अपघात; दाेघे तरुण जागीच ठार

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचाेरा तालुक्यातून जळगाव शहरात येऊन फळविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दाेन विक्रेत्या तरुणांचा कार व दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना साेमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता तालुक्यातील रामदेववाडी गावातील हनुमान मंदिराजवळ घडली. दाेघांचे मृतदेह जीएमसी रुग्णालयात आणण्यात आले.

रफिक हुसेन मेवाती (वय २३) व अरबाज जहाँगीर मेवाती (वय २०) हे दाेघे पाचाेरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथील रहिवासी असून, ते जळगाव शहरातील मास्टर काॅलनीत पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. साेमवारी संध्याकाळी व्यवसाय करून ते दुचाकी क्रमांक एमएच १९ सीएच ४३५९ ने राणीचे बांबरूड येथे घरी परत जात हाेते. शिरसाेली गाव ओलांडल्यानंतर रामदेव वाडीतील हनुमान मंदिराजवळ समाेरून आलेल्या लाल रंगाच्या इंडिका कारने (क्र. एमएच १९ बीजे २१७५) जाेरदार धडक दिली. त्यात या दाेन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

जीएमसीत आज शवविच्छेदन हाेणार अपघातानंतर मृतदेह जीएमसी रुग्णालयात आणण्यात आले. संध्याकाळ झाल्याने मृतदेहाचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात येईल. दरम्यान, रात्री उशिरा एमआयडीसी पाेलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्याचे काम सुरू हाेते.

बातम्या आणखी आहेत...