आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅरीबॅग:कॅरीबॅग तयार करणारी कंपनी केली सील ; हिंदुस्तान इंडस्ट्रीजची बुधवारी तपासणी करण्यात आली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत. कॅरीबॅगचे उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांवर १ जूनपासून कारवाई सुरू केली आहे. एमआयडीसीत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग तयार करणाऱ्या हिंदुस्तान इंडस्ट्रीजची बुधवारी तपासणी करण्यात आली. त्यात साठा आढळून आल्याने कंपनीला सील ठाेकण्यात आले. आठवडाभरापुर्वीच व्यावसायीकांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर न करण्याचे आवाहन आयुक्त विद्या गायकवाड यांनी केले होते. १ जूनपासून कारवाईचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्या नेतृत्वात एमआयडीसीतील डब्ल्यू १६ सेक्टरमध्ये जगदीश लिलाराम भारवानी यांच्या हिंदुस्तान इंडस्ट्रीजची तपासणी करण्यात आली. तेथे पथकाला ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅग आढळून आल्या. त्यांचा नर्सिंग व कृषी कामासाठी वापर होत असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र सादर केली नाहीत. त्यामुळे पथकाने कंपनीला सील ठोकले. आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, अतिक्रमण विभागप्रमुख संजय ठाकूर, सतीश ठाकरे, नाना कोळी, संजय हरी पाटील, नितीन भालेराव, किशोर सोनवणे, शेखर ठाकूर, दीपक कोळी आदी कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

एमआयडीसीतील हिंदुस्तान इंडस्ट्रीज येथे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग तयार केल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी करताना महापालिकेचे पथक.

बातम्या आणखी आहेत...