आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘कॅश अॅडव्हान्स’ या ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अॅपच्या माध्यमातून जामनेर येथील ऑनलाइन सेवा केंद्र चालवणाऱ्या एका तरुणास ५३ हजार ५९३ रुपयांचा गंडा भामट्यांनी घातला. अश्लील मेसेज करून खंडणी मागितली. याप्रकरणी रविवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
नीलेश संपत जाधव (वय २८, रा. जामनेर) या तरुणाची फसवणूक झाली आहे. नीलेश हा जामनेर शहरात ऑनलाइन सेवा केंद्र चालवतो. २९ मार्च २०२२ रोजी त्याने ‘कॅश अॅडव्हान्स’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. या माध्यमातून काही सेकंदात कर्ज उपलब्ध होत असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार नीलेशने प्रक्रिया पूर्ण केली. त्याने वेळोवेळी २ लाख २९ हजार ९४ हजार रुपये ऑनलाइन कर्ज घेतले. सेवा शुल्क म्हणून त्याच्याकडून ८८ हजार ८१० रुपये कंपनीने कापून घेतले. उर्वरित १ लाख ४० हजार २५४ रुपये नीलेशच्या खात्यात जमा केले होते. कर्ज मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत फेडण्याची मागणी करणारे फोन नीलेशला येऊ लागले. त्यानुसार त्याने १ लाख ४० हजार २५४ रुपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज ५३ हजार ५६४ रुपये असे एकूण १ लाख ९३ हजार ८१८ रुपये असा भरना देखील केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.