आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील मॅसेज करुन खंडणीची मागणी:ऑनलाइन सेवा केंद्र चालवणाऱ्या तरुणास ‘कॅश अ‍ॅडव्हान्स’ अ‍ॅपच्या नावाने 53 हजारांनी गंडवले

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कॅश अ‍ॅडव्हान्स’ या ऑनलाइन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपच्या माध्यमातून जामनेर येथील ऑनलाइन सेवा केंद्र चालवणाऱ्या एका तरुणास 53 हजार 593 रुपयांचा गंडा भामट्यांनी घातला. अश्लील मॅसेज करुन खंडणी मागितली. या प्रकरणी रविवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश संपत जाधव (वय 28, रा. जामनेर) या तरुणाची फसवणूक झाली आहे. निलेश हा जामनेर शहरात ऑनलाइन सेवा केंद्र चालवताे.

29 मार्च 2022 रोजी त्याने कॅश अ‍ॅडव्हान्स नावाचे मोबाइल अ‍ॅप्लीकेशन डाऊनलोड केले. या माध्यमातून काही सेकंदाच कर्ज उपलब्ध होत असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार निलेशने प्रक्रिया पुर्ण केली. त्याने वेळोवेळी 2 लाख 29 हजार 94 हजार रुपये ऑनलाईन कर्ज घेतले. सेवा शुल्क म्हणून त्याच्याकडून 88 हजार 810 रुपये कंपनीने कापून घेतले. उर्वरित 1 लाख 40 हजार 254 रुपये निलेशच्या खात्यात जमा केले होते. कर्ज मिळाल्याच्या सात दिवसाच्या आत फेडण्याची मागणी करणारे फोन निलेशला येऊ लागले.

त्यानुसार त्यााने 1 लाख 40 हजार 254 रूपये आणि कर्जाच्या रकमेवरील व्याज 53 हजार 564 रूपये असे एकुण 1 लाख 93 हजार 818 रुपये ऑनलाइन पद्धतीने परत केले. तरी देखील त्याच्याकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांची बदनामी करुन असे फोन त्याला दररोज येऊ लागले. याच दरम्यान, भामट्यांनी त्याच्या मोबाइलमधील संपुर्ण डाटा चोरला होता. अश्लिल मॅसेज करुन नीलेशकडून खंडणी मागण्याचाही प्रकार सुरू केला. भामट्यांच्या त्रासाला कंटाळुन अखेर नीलेशने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...