आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:व्यवसाय कर रद्द करण्यासाठी देवेंद्र‎ फडणवीस यांना कॅटने घातले साकडे‎

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीएसटी लागू करताना केंद्र व राज्य‎ शासनाने सर्व प्रकारचे स्थानिक कर रद्द‎ करण्याचे जाहीर केले हाेते.‎ त्याअनुषंगाने राज्य शासनाने व्यवसाय‎ कर त्वरित रद्द करावा. अर्थसंकल्पात‎ तशी शिफारस करावी, अशी मागणी‎ जिल्हा कॅटतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे‎ करण्यात अाली अाहे.‎ २०१७ साली जीएसटी लागू करताना‎ केंद्र व राज्य शासनाने सर्व प्रकारचे‎ स्थानिक कर रद्द करण्यात येतील असे‎ जाहीर केले होते.

त्यानुसार‎ उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी अर्थसंकल्पात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व्यवसाय कर रद्द करण्याची शिफारस‎ करावी, अशी मागणी कॅट जळगाव‎ जिल्हाध्यक्ष संजय शहा, राज्य वरिष्ठ‎ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, राज्य सचिव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिलीप गांधी, प्रवीण पगारिया यांनी‎ केली आहे. तसेच याबाबत सातत्याने‎ पाठपुरावा देखील करण्यात येत‎ असल्याचे कॅटने सांगितले.‎

जिल्ह्यातील उद्योगांबाबत आज उद्योगमंत्र्यांसाेबत चर्चा‎
जिल्ह्यातील उद्योग-व्यापार क्षेत्राच्या‎ विविध प्रलंबित प्रश्नांबाबत ९ मार्च‎ रोजी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या‎ अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक होणार‎ आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,‎ इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरतर्फे १६‎ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा विकास‎ परिषद झाली हाेती. परिषदेचे उद््घाटक‎ उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्ह्याच्या‎ उद्योग-व्यापार क्षेत्राच्या प्रश्‍नांसंबंधी‎ मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले‎ होते. त्यानुसार ही बैठक होणार आहे.‎ या वेळी आमदार सुरेश भोळे, उद्योग‎ विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप‎ कांबळे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव‎ दिनेश वाघमारे, उद्योग विकास‎ आयुक्त दीपेंद्र कुशवाह,‎ जिल्हाधिकारी अमन मित्तल अादी‎ उपस्थित राहणार असल्याचे ललित‎ गांधी यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...