आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘आरएल’ समूहाचे जळगावातील सुवर्णदालन, २ ऑटाेमाेबाइल तसेच नाशिक येथील सुवर्ण दालन अशा ४ प्रतिष्ठानांसह दाेन निवासस्थानी सीबीआयने मंगळवारी छापे टाकले.
एसबीआयने ५२६ काेटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात साेमवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली. ही पथके बँकेच्या संदर्भातील कागदपत्रांसह लॅपटाॅप ताब्यात घेऊन संध्याकाळी रवाना झाली.आरएल ज्वेलर्सचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना सर्च वाॅरंट दाखवून निवासस्थानात ८ ते १० जणांच्या पथकाने सर्चिंगला सुरुवात करून कागदपत्रे ताब्यात घेतली.
काय आहे बँक कर्ज प्रकरण?
आरएल समूहाने स्टेट बँकेकडून ५२६ काेटींचे कर्ज घेतले आहे. ते २००९ पासून थकीत हाेऊन खाते एनपीए झाले. या कर्जापाेटी एसबीआयने आरएलच्या तीन ते चार मालमत्ता जप्त करून त्यांची विक्री केली आहे. तसेच बँक खात्यातील मुदत ठेव व रक्कम असे सुमारे १० काेटी रुपये बँकेने वसूल केले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार आरएल समूहाकडे १५०० काेटी रुपये कर्ज बाकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.