आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई:सीबीएसई बाेर्डाचे बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण 14 वरून 25%

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीएसई बोर्डाकडून चालू शैक्षणिक वर्षात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२३पासून सुरू होणाऱ्या या दोन्ही वर्गांच्या परीक्षेत बहुपर्यायी (ऑब्जेक्टिव्ह) प्रश्नांचे प्रमाण २२ ते २५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.

काेराेनापूर्वी ‘एमसीक्यू’चे फक्त १४ ते १५ टक्केच प्रश्न विचारले जात होते. परंतु, आता या परीक्षा पद्धतीत नवीन बदल केल्याने भविष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या हाेत्या. यंदापासून एकच वार्षिक परीक्षा होईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार टिचिंग-लर्निंग-एक्झाम व असाइनमेंट अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. यंदापासून बोर्ड परीक्षेत कॉम्पिटन्सी व अॅप्लिकेशनवर आधारित प्रश्नांची संख्या वाढवली आहे. विद्यार्थ्यांना घोकंपट्टी व अभ्यासाच्या सवयीतून बाहेर काढण्याचा नव्या शैक्षणिक धोरणाचा उद्देश असल्याने बहुपर्यायी प्रश्नांवर अधिक भर दिला जाताे.

बोर्डाच्या सॅम्पल पेपरनुसार गुणांचे वर्गीकरण
फिजिक्स-केमिस्ट्री : गुण ७०, वेळ ३ तास, प्रश्न संख्या ३५, एमसीक्यू प्रश्न १८, एमसीक्यू मार्क १८, प्रमाण २५.७ %
गणित : गुण ८०, वेळ ३ तास, प्रश्न संख्या ३८, एमसीक्यू प्रश्न १८, एमसीक्यू एकूण मार्क
१८, प्रमाण २२.५ %
बायोलॉजी : गुण ७०, वेळ ३ तास, प्रश्न संख्या ३३, एमसीक्यू प्रश्न १६, एमसीक्यू एकूण मार्क
१६, प्रमाण २२.८५ %

सन २०२२मध्ये दोन टर्म परीक्षा; आता ताण कमी हाेणे शक्य
कोरोनाकाळात पूर्णवेळ वर्ग न झाल्याने २०२२मध्ये सीबीएसइने दोन टर्म परीक्षा घेतली. पहिल्या टर्ममध्ये ऑब्जेक्टिव्ह तर दुसऱ्यात सब्जेक्टिव्ह प्रश्नांवर पेपर घेतला होता. मात्र, यंदापासून एकच वार्षिक परीक्षा हाेईल. तसेच बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण वाढवल्याने विद्यार्थ्यांत काेराेनामुळे गेलेला आत्मविश्वास पुन्हा परत येण्यास मदत हाेईल. तसेच भविष्यातील अनेक परीक्षा या बहुपर्यायी स्वरूपातील राहणार असल्याने त्याची तयारी हाेईल. बाेर्डाच्या परीक्षेचा ताणही कमी हाेईल असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, बहुपर्यायी प्रश्नांचे प्रमाण वाढल्याने ते भविष्यात विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...