आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधी पंचायती:सिंधी पंचायतीतर्फे गुणवंतांचा गाैरव

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिंधी पंचायतीतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला. सिंधी कॉलनीतील झुलेलाल सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दहावी, बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या ३५ गुणवंतांना गाैरवण्यात आले.

अध्यक्षस्थानी लक्ष्मणदास अडवानी होते. यजुर्वेंद महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशाची शिखरे गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करीयर घडवावे असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्ष लक्ष्मणदास आडवानी यांनी समाजातील शैक्षणिक योगदानाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद विसराणी यांनी केले. शहर पंचायतीचे अध्यक्ष शीतलदास जवाहरानी, सेक्रेटरी कमलेश वासवानी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सदस्य समाजबांधव उपस्थित होते. राजेश जवाहरानी, हरीश रायसिघानी, रवी मंगलानी, शैलेश आहुजा यांनी नियोजन केले.

बातम्या आणखी आहेत...