आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स (पीसीएम) या ग्रुपची सीईटी अनिवार्य असते. बारावीनंतर एमएचटी सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली असून ११ ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरु राहणार आहे. पीसीएमचे ८ हजार १७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरातील चार केंद्रांवर दुपारच्या सत्रात सुरळीत परीक्षा पार पडली.
आयएमआर, केसीई इंजिनिअरिंग, गोदावरी इंजनिअरिंग व पाळधी येथील एसएस सिस्टिम्स या चार केंद्रांवर सीईटी घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणी आल्या नाहीत. पेपर सुरू होण्याच्या दीड तास आधी विद्यार्थ्यांना केंद्रांवर प्रवेश मिळाला.
पीसीबीसाठी १० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
पीसीएमनंतर बी.फार्मसीसाठी अनिवार्य असलेल्या पीसीबी ग्रुपची १२, १३, १४, १७, १८ व २० ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असून या परीक्षेला ९९२१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहे. निकालानंतर कॅप राउंडद्वारे प्रवेशप्रक्रिया राबवली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.