आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह वक्तव्य:बकाले यांच्या अटकेसाठी 10 पासून साखळी उपाेषण ; सर्व संघटना सहभागी हाेणार ​​​​​​​

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे निलंबित व गुन्हा दाखल असलेले एलसीबीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी साेमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर बेमुदत साखळी उपाेषण करण्यात येणार आहे. या उपाेषणात सर्व जाती, धर्म, संघटना सहभागी हाेणार आहेत. दरम्यान, पोलिस प्रशासनाने बकालेस अटक न केल्यास पुढे सनदशीर मार्गाने समाजाकडून ठोक आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने पाेलिस प्रशासनासाेबत झालेल्या बैठकीत दिला.

अ. भा. छावा मराठा युवा संघटना, मराठा सेवा संघ यासह सकल मराठा समाजातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी व पाेलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यात निलंबित पोलिस निरीक्षक बकालेंना अटक करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही त्यांना जाणूनबुजून अटक केली जात नाही. त्यामुळे सर्व जाती, धर्माच्या विविध संघटना या १० ऑक्टाेबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणास बसू, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...