आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीसगावमध्ये मूकबधिर तरुणीवर सामूहिक अत्याचार:मारहाण करत अत्याचार करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव तालुक्यातील एका गावाजवळील तलावाजवळ 25 वर्षीय मूकबधिर तरुणीला मारहाण करीत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी बुधवारी तिघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेतील विकृत नराधमांचा कसून शोध सुरू केला आहे.

पहाटेपर्यंत तरुणीवर अत्याचार

चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय पीडिता मूकबधिर असून गावाजवळील एका तलावाजवळ तिच्यावर अत्याचार करण्यात आले. यावेळी तीन संशयितांपैकी दोघांनी तिच्या डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर त्यातील एकाने पीडितेवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री 8 वाजता घडली. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत तिघे तरुण तिच्यावर अत्याचार करीत होते. गंभीर अवस्थेत सोमवारी सकाळी ही तरुणी घरी पोहोचली. यानंतर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.

कुटुंबीयांची पोलिसांमध्ये धाव

मूकबधिर असल्यामुळे तिने पोलिसांना माहिती देण्यासाठी विशेष शिक्षिकेसमोर इशाऱ्याने हा सर्व प्रकार सांगितला. तसेच अत्याचार करणारे समोर आल्यास त्यांना ओळखेल, असेही तिने सांगितले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंग देशमुख हे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिस अत्याचार करणाऱ्या संशयिताचा तपास करीत आहेत.

चाळीसगाव तालुका हादरला

या घटनेमुळे संपुर्ण चाळीसगाव तालुका हादरला आहे. रात्रभर अमानुषपणे अत्याचार केल्यामुळे तरुणीची प्रकृती अत्यव्यस्थ झाली आहे. तरुणीवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर तीनही संशयित बेपत्ता झाले आहेत. ते शेजारच्या गावातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या अनुशंगाने पोलिस तपास करीत आहेत. शेजारच्या गावातील तरुण मिसींग आहेत काय? याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयातून देखील या घटनेच्या तपासावर लक्ष दिले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...