आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागौताळा अभयारण्यातील वन्यजीवांच्या नोंदी घेण्यासाठी, 5 मे रोजी बुद्ध पौर्णिमेला निवडक पाणवठांवर प्राणी पाहणी निसर्गानुभव कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. यासाठी अभयारण्यातील १८ पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यासह मचाण उभारण्यात आले आहेत.
आज दुपारी ४ ते दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ८ या कालावधीत प्रत्यक्ष वन्यप्राणी निरीक्षण करून नाेंदी घेतल्या जाणार आहेत. या काळात पर्यटकांसाठी अभयारण्य बंद राहणार आहे. ६ हजार ३५२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेले गौताळा औट्रमघाट अभयारण्य राज्यातील मोठे अभयारण्य मानले जाते.
या अभयारण्यात ४२ किमी लांबीचे सह्याद्रीचे पठार असून ८०० ते २००० हेक्टरचे पाटणा, ओढरे, बोढरे, जुनोने असे चार वनकक्ष, सोबत पाटणा तसेच बाेढरा हे दोन वनपरीमंडळ आहेत. वन्यजीव विभागाकडून तेथे तयार करण्यात आलेले ३० नैसर्गिक व २० कृत्रिम असे एकूण ५० पाणवठे आहेत.
अवकाळी पावसाचे सावट
पाणस्थळांवर निरीक्षण अभयारण्यातील जुनाेने तलाव, पाटणा, बाेढरे व अाेढरे िबट परिसरात एकूण पाच कृत्रिम पाणस्थळांवर ट्रॅप कॅमेेरे लावून, तसेच जुनाेने िबट भागात ४ िठकाणी, बाेढरे परिसरात ३, पाटणा येथे ४ व अाेढरे येथे २ व इतर ५ अशा एकूण१८ ठिकाणांवर मचाण उभारून प्रत्यक्ष निरीक्षण करून प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. यासाठी उपयुक्त स्थळांचे निरीक्षण करून मचाण उभारण्यात अाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांनी दिली.
अभयारण्यात नाेंदी घेताना नियमांचे पालन करणे गरजेचे
मानवी हस्तक्षेपामुळे प्राण्यांच्या संख्येवर कोणता परिणामा झाला आहे का? कोणत्या प्राण्यांची संख्या कमी होत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्यप्राण्यांची गणना केली जाते. बुद्ध पौर्णिमा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात येत असल्याने जंगलातील झाडांची पाने गळून गेलेली असतात.
त्यामुळे लांबपर्यंतचे प्राणी मचाणावरून दिसतात. त्यामुळे दूरच्या अंतरावरूनही प्राण्यांचे दर्शन होते. यंदा मात्र ६ मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज अाहे. त्यासोबतच तालुक्यात दाेन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने यंदाच्या प्राणी गणनेवर अवकाळी पावसाचे सावट असल्याने अनेकांचा हिरमाेड झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी दिसला वाघ
वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अाणि निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहेत. दोन वर्षांपूर्वी गौताळा अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसील अंतर्गत असलेल्या टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातून अालेला वाघ िदसून अाला हाेता.
तर गतवर्षी झालेल्या प्राणी गणनेत अभयारण्यात ७ बिबट्यासंह तब्बल ३३२ प्राणी आढळून आले होते. त्यामुळे यंदा िनसर्गानुभव कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. पाटणादेवी अभयारण्यात प्राणी गणनेसाठी वन विभागाने तयार केलेले अभयारण्यातील पाणस्थळांवर निसर्गानुभव कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी तात्पुरते मचाण उभारण्यात अाले आहेत.
उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता वन्यजीव पाणवठ्यांवर पाणी पिण्यास येतात, त्यांच्या नोंदी घेतल्या जातील. सहभागी होणाऱ्या व्यक्तींना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व संरक्षित क्षेत्राच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.
-ज्ञानेश्वर देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.