आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गण रचना:आव्हाणे, रायपूरसह तरसोद गण ‘जैसे थे’; मोहाडीचा निर्णय राखून ; विभागीय आयुक्तांकडे सुनावणी दरम्यान निर्णय

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जि. प. गटरचनेत आव्हाणे गावाचा आसोदा- ममुराबाद गटात तर मोहाडीचा भादली बु. गटात समावेश करण्यात आला होता. यासह रायपूर भादलीतून तोडून म्हसावद गटात समाविष्ट करण्यात आले होते. यावर हरकती दाखल झाल्यानंतर शुक्रवारी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी झाली. यावेळी गणातील भौगोलिक परिस्थती, सीमांकनानुसार आव्हाणे गणाचा पुन्हा कानळदा गटात समावेश करण्यात आला आहे. यासह तरसोद आसोदा गटातून वगळून पुन्हा भादली बु. गटात टाकण्यात आले आहे. त्यामुळे ही ‘जैसे थे’ स्थिती झाली आहे. दरम्यान मोहाडी गणात हरकतधारकांची बाजू ऐकून घेतली असून यावर शनिवार निर्णय होण्याची शक्यता आहे. जि.प.च्या ७७ व पंचायत समित्यांच्या १५४ मतदारसंघांच्या प्रस्तावित रचनेवर ७४ जणांनी हरकती दाखल केल्या आहेत. शुक्रवारी यातील बहुतांश हरकती व सूचना विभागीय आयुक्तांनी जाणून घेतल्या. यात आव्हाने गण हा कानळद्यातून वगळून ममुराबादला जोडला होता. याविरोधात माजी पं. स. समिती सदस्य अॅड. हर्षल चौधरी यांनी हरकती दाखल केली होती. यात राज्यमार्ग दोन गटांना विभाजित करतो, यासह एसटी समाज तोडला जावू नये हे मुद्दे मांडले होते. ते आयुक्तांनी मान्य करीत पुन्हा कानळदा गटात समावेश करण्याचे पत्र काढले. यासह तरसोद-असोदा गटात जोडले होते ते काढून पुन्हा भादली बु. गटात जोडण्यावर आयुक्तांनी मान्यता दिली. रायपूरचा पुन्हा कुसुंबा गणात समावेश करण्यात आले आहे. तर मोहाडी गणाच्या बदलावर अद्याप निर्णय अंतिम नाही. पुढील दोन दिवसात निर्णय असल्याचेही तहसीलदार नामदेव पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहात पोहोचण्यासाठी इच्छुकांची गर्दीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना सक्रिय झाल्या असून निवडणूक लढण्याच्या दृष्टीने त्यांची तयारी सुरु झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघाचे सीमांकन महसूल आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही विभागाच्या संयुक्त प्रयत्नाद्वारे करण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना-बर-हुकूम ते करण्यात आल्याने त्यात बदलाला फारशी संधी नाही. तरी देखील नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे क्रमप्राप्त असल्यामुळे येत्या काळात सुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यातून ७४ जणांनी हरकतींद्वारे आपापले दावे दाखल केले आहेत. या सर्व दाव्यांच्या सुनावणीअंती २७ जून रोजी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे.

आता पुढे काय? जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप रचनेला एकदा अंतिम मान्यता मिळाली की त्या-त्या मतदारसंघाचे सीमांतक निश्चित होणार आहे. त्यानंतर सदर मतदारसंघांमधील अर्थात गट व गणांमधील एससी, एसटी व महिलांसाठीच मतदारसंघ निश्चित केले जातील. ही कृती आटोपल्यानंतर मतदार यादी तयार केली जाऊन पुढे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...