आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची गैरसोय:एसटी बसस्थानकात चेंबर चोकअप;स्वच्छतेच्या त्रिसूत्रीवर महामंडळ करणार काम

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांचा प्रवास सुरक्षित असण्यासह तो प्रसन्नही असावा यासाठी एसटी महामंडळाने कात टाकण्याचा संकल्प केला आहे. येत्या काळात स्वच्छ व सुंदर बसथानक व टापटीप स्वच्छतागृहे या त्रिसूत्रीवर महामंडळ काम करणार असले तरी जळगाव विभागातील मुख्य व जिल्ह्याचे स्थानक असलेले जळगाव स्थानकात विविध ठिकाणी अस्वच्छता दिसून आल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला.

बसस्थानकात ठिकठिकाणी कुत्र्यांचा वावर, खुर्च्यांखाली घाण, कार्यालयांतून येणारे सांडपाण्याचे चेंबर चोकअप झाल्याने आगारातून वाहणारे सांडपाण्यातून प्रवाशांना रस्ता काढावा लागत आहे.

व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर मुख्यमंत्र्यांनी १८ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत बसस्थानक, विश्रांतीगृहे व गाड्यांची स्वच्छता राखण्याबाबत निर्देश दिले आहे. त्यानुसार व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केली आहे. ही समिती दर आठवड्याला शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानुसार आगार प्रमुखांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून या त्या-त्या बसस्थानक, आगारातील स्वच्छतागृहे, विश्रांती गृहे, स्वच्छ बस यांचे फोटो शेअर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...