आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्विकारताच कुलसचिव गुलाबरावांच्या निवासस्थानी:अभियांत्रिकीचे प्रकरण न्यायालयात, सहकार्याची पाटलांची ग्वाही

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्विकारला. त्यानंतर रविवारी थेट पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांनी मंत्र्यांचा सत्कार करुन आशिर्वाद घेतला. डॉ.पाटील यांच्याविरुध्द अभियांत्रिकीच्या गुणदान प्रकरणात आरोप झालेले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

अभियांत्रिकीच्या प्रकरणात आरोपी करण्याबाबत कुलसचिव डॉ.पाटील यांच्याविरुध्द न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो न्यायालयाने फेटाळून लावला होता. आता पुन्हा त्यांच्याविरुध्द अर्ज करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांच्यासह सहा जणांना आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर

रविवारी कुलसचिव डॉ.पाटील यांच्यासह विद्यापीठाचे उपअभियंता राजेश पाटील, सुरेश चव्हाण, सोपान पाटील, नारायण सोनवणे आदी पाळधी येथील मंत्री पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सर्व चांगल्या गोष्टींसाठी तसेच शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबध्द आहे.

निधीची कमतरता नाही

अलीकडेच विद्यापीठाच्या नवीन योजनांसाठी भरीव निधी मिळवून देण्यात आला. आणखी काही आदर्श आणि विकासात्मक कामांसाठी भविष्यात सुध्दा निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नुकतीच डॉ. विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 7 सप्टेंबर रोजी कुलसचिव पदाचा पदभार स्विकारला.

सहकार्य करण्याची दिली ग्वाही

रविवारी कुलसचिव डॉ.पाटील यांनी मंत्री पाटील यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. विद्यापीठाच्या विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात देखील या प्रकारचे सहकार्य कायम राहणार असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणाची ख्याती ही देश-विदेशात पोहचवावी. हा लौकीक वाढविण्यासाठी आपल्याला हवे असणारे सर्वतोपरी सहकार्य राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...