आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत रोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आजदेखील जळगावमध्ये मविआवर टीका केली. मविआतील नेते आणि मंत्र्यांच्या कृत्यामुळे राज्यातील जनतेची झोप उडाली आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
यावेळी बोलताना एकनाथ खडसेंवरही चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधत त्यांनी जरा जपून बोलावे, असे म्हटले आहे. यासोबतच एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादीत गेले असले, तरी त्यांच्याबद्दल आजही आमच्या मनात आदर आहे. त्यांना भाजपमध्ये जे काही मिळत होते त्यावर त्यांनी समाधानी असायला हवे होते. पक्षाचे नुकसान न करता खडसेंनी पुढे जायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. खडसे आमच्यावर आरोप - प्रत्यारोप करत असतील, मात्र आम्ही तसे करणार नाही, त्यांनी ही जपून बोलले पाहीजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे, बाकी ते जेष्ठ नेते आहेत. योग्य काय ते ठरवतील, असा टोलाही पाटलांनी लगावला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या मविआच्या मंत्री आणि नेत्यांविरोधात रोज आरोप करत असतात आणि याला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत उत्तर देत असतात. त्यानंतर काल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही जोरदार आरोप केले होते. या सर्व आरोपांना आज चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाही!
आमच्यामुळे जनतेचे मनोरंजन होत नाही. मात्र मविआच्या नेत्यांमुळे जनतेची झोप उडाली आहे, अशी टीका पाटलांनी केली. रोज एका नव्या प्रकरणात मविआचे मंत्री अडकत आहे, असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.